जगात सगळ्यात जास्त विकली जाणारी कार म्हणजे सुझुकी (भारतामध्ये मारुती सुझुकी) आणि सगळ्यात चांगली कार म्हणजे टोयोटा. आश्चर्य म्हणजे, दोन्ही कार जपानी आहेत. जपानच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आपल्या मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअर्सना कशा प्रकारच्या संधी आहेत, ते आपण पाहूया.
१९०२ – जपानने पहिली कार तयार केली
१९१४ – पहिली मित्सुबिशी कार तयार झाली.
१९२५ – फोर्डने जपानमध्ये युनिट सुरू केले.
१९६२ – जपानने पहिली मोटरबाईक तयार केली.
१९७० – जपानने कोट्यवधी कारची निर्यात केली.
१९७४ – जपान जागतिक पातळीवर सगळ्यात जास्त कार निर्यात करणारा देश ठरला.
१९७८ – जपानच्या कार कंपन्यांनी जपानबाहेर विस्तार सुरू केला.
१९८० – जपान जागतिक पातळीवर सगळ्यात जास्त कार तयार करणारा देश होता.
२००८ – टोयोटा जगात सगळ्यात जास्त कार विकणारी कंपनी ठरली आणि अजूनही आहे.
हे सगळे होण्यासाठी जपानी सरकारचे धोरण वेळोवेळी नक्कीच उपयोगी ठरले, यात काही शंका नाही. टोयोटाने तयार केलेली काईझेन सिस्टिम जगप्रसिद्ध आहेच, त्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोज कामामध्ये सुधारणा करून कार्यक्षमता वाढविणे. याबरोबरच होंडा, निस्सान, कुबोटा यांसारख्या अनेक कार आणि ऑटोमोबाईल उत्पादने असणाऱ्या अनेक जपानी कंपन्या जगप्रसिद्ध आहेत.
भारतीयांना या क्षेत्रात खूप चांगली संधी आहे. फक्त योग्य शिक्षणाबरोबरच जपानी भाषा लेव्हल ३ पर्यंत यायला हवी.
1)डेव्हलपमेंट इंजिनिअर –
जपानमध्ये डेव्हलपमेंट इंजिनिअरचे जॉब मिळविण्यासाठी CAD सॉफ्टवेअर वापरण्यात प्रवीणता असणे आवश्यक आहे आणि ऑटोमोटिव्ह उद्योगात स्ट्रक्चरल डेव्हलपमेंटचा अनुभवही आवश्यक आहे. संबंधित प्रोजेक्ट टीम, प्रॉडक्शन पार्टनर आणि पुरवठा कंपन्या यांच्याशी जवळून काम करण्याचीही जबाबदारी उमेदवाराची असेल.
2) मेकॅनिकल इंजिनिअर –
उमेदवार मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील पदवीधर असावा आणि त्याला 3D CAD मॉडेल विकसित करण्याचा अनुभव असावा. आवश्यक असलेल्या संबंधित विषयातील तज्ज्ञांसह यांत्रिक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये सखोल ज्ञान असले पाहिजे.
3) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर –
जपानमधील मेकॅनिकल अभियांत्रिकी डोमेनमध्ये काम करण्यासाठी उमेदवारास इलेक्ट्रॉनिक्स डिझाइन अभियांत्रिकी, सिस्टिम अभियांत्रिकी किंवा ऑटोमोटिव्हमध्ये आवश्यक अभियांत्रिकीचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. अंतर्गत अभियांत्रिकीचे इलेक्ट्रिकल, फंक्शनल आणि परफॉर्मन्स देणारे फंक्शनल सोल्युशन्स तयार करण्याची जबाबदारीही असेल.
4) टेस्ट इंजिनिअर –
उमेदवारास संबंधित क्षेत्रात किमान ५ पेक्षा अधिक वर्षांचा अनुभव असावा. मापन किंवा सेन्सर तंत्रज्ञानाचेही ज्ञान असावे आणि कोटेशनसाठी प्रकल्प वैशिष्ट्यांचे विश्लेषण, सत्यापन परिभाषित करण्यास सक्षम असावे.
5) प्रोजेक्ट मॅनेजर –
उमेदवारास प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात किमान ६ वर्षांचा अनुभव असावा. ग्राहकांच्या शेवटी योग्य अंमलबजावणी, नियोजन आणि व्यवस्थित वितरणासह परदेशी आयटी डेव्हलपमेंट करण्यास देखील सक्षम असावे.
6) बिझनेस मॅनेजर –
उमेदवार, ग्राहकांकडून डेव्हलपमेंट आणि डिझाइनपर्यंत नवीन प्रकल्पांची माहिती प्रसारित करण्यास जबाबदार असेल. ऑर्डर मिळण्यासाठी क्रियाकलाप करण्यास सक्षम असेल आणि ग्राहकांसह नफा सुधारण्याच्या उपक्रमांद्वारे योग्य नफा दाखवू शकेल.
7) आर ॲण्ड डी इंजिनिअर –
उमेदवाराला ग्राहकांच्या शेवटी कंपनीचे रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट (आर ॲण्ड डी) इंजिनिअर म्हणून काम करावे लागेल, वेळापत्रक आणि बजेट व्यवस्थापित करावे लागेल आणि आर ॲण्ड डी करणाऱ्यांची देखरेख करावी लागेल. सहज संभाषणांसाठी जपानी आणि व्यवसाय स्तरावरील इंग्रजी बोलू शकले पाहिजे.
8) ADAS इंजिनिअर –
उमेदवाराने तांत्रिक विकासात साहाय्य करण्यासाठी टेस्ट स्ट्रॅटेजी, टेस्ट कशा करायच्या इत्यादी विकसित करण्यास सक्षम असावे. घटक आणि टोटल दोन्ही पातळीवर चाचणी धोरणाच्या विकासास पाठिंबा देण्याची क्षमता देखील एक असणे आवश्यक आहे.
9) सोल्युशन आर्किटेक्ट –
या प्रोफाइलसाठी, उमेदवारास डेटाआधारित सोल्युशन्ससह वेगवेगळ्या प्रयोगांचे समर्थन देऊन ग्राहकांची प्राथमिकता समजण्यास आणि त्यांच्या तंत्रज्ञानाच्या मूलभूत सुविधांचे मूल्यांकन करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तांत्रिक कौशल्य प्रदान करण्यास सक्षम असले पाहिजे.
याव्यतिरिक्त आणखी बऱ्याच नोकऱ्या जपानमधील मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये, तसेच भारतामधील जपानी कंपन्यांमध्ये आहेत.
जपानमध्ये भविष्यातील अभ्यासक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. त्याचबरोबर ड्रोन, वेगवेगळ्या प्रकारच्या बाइक्स अशा अनेक क्षेत्रांत मोठे काम होत असून, जपान भारतामध्ये या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहे. त्यासाठी दोन्ही देशांमध्ये सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणात विचारविनिमय होत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील उमेदवारांनी जपानी भाषा शिकून संधीचे सोने केले पाहिजे.
Credit Link – https://www.esakal.com/education-jobs/article-write-sujata-kolekar-japan-and-opportunity-377376
लेखकाचे नाव – सुजाता कोळेकर, सिनिअर डायरेक्टर, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया.