जपानी सौंदर्यातील ट्रेंड: सौंदर्य इंडस्ट्री आणि नोकऱ्या
तुम्ही जपानच्या कुठल्याही मॉलमध्ये किंवा प्रसिद्ध ठिकाणी गेल्यास मसाज पार्लर आढळतीलच. या मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मसाज केला जातो आणि त्यात भारतीय आयुर्वेदिक पद्धतीच्या अभ्यंगचा समावेश आहे. जपानमधील ५० वर्षाच्या स्त्रिया पाहिल्या, तर त्या अगदी तिशीतल्या असल्यासारख्या दिसतात. त्यात त्यांच्या खाण्याच्या सवयीचा आणि नियमित व्यायामाचा वाटा आहेच, परंतु त्यामध्ये जपानमधील सौंदर्य प्रसाधनांच्या कंपन्यांचाही तेवढाच वाटा आहे.…