जपानमधील MEXT या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून परदेशी देशांकडून उत्कृष्ट मानवी संसाधने स्वीकारणे, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून परदेशी देशांशी परस्पर सामंजस्य वाढवणे आणि मानवी नेटवर्क तयार करणे, जपानी विद्यापीठांच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षमता बळकट करणे आणि आंतरराष्ट्रीय बौद्धिक योगदान देणे यांचा समावेश आहे.
Student Exchange Support Program:
अगदी माध्यमिकपासून ते ‘पीएचडी’पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळू शकते. ती जपानी विद्यापीठे, शाळा, ज्युनिअर किंवा सीनियर हायस्कूल, प्रोफेशनल ट्रेनिंग स्कूल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था देतात. यामध्ये स्टायपेंड साधारण ८०,००० जपानी येन इतका मिळू शकतो.
या व्यतिरिक्त जपानमध्ये जपानी भाषेच्या खूप संस्था आहेत, तिथे त्यांची फी भरून शिकता येते. तिथे शिकत असताना पार्ट टाइम नोकरी करता येते. त्यामुळे सुरुवातीची फी भरली तर बाकी खर्च नोकरीद्वारे काही विद्यार्थी अगदी व्यवस्थित करिअर करतात.जपानी कंपन्यांमध्ये शॉर्ट टर्म इंटर्नशिप्स – या वेगवेगळ्या टेक्निकल कंपन्यांमध्ये इंटर्नशिप्स असतात. यासाठी पूर्वीची ओळख किंवा तुम्ही भारतात ज्या कंपनीमध्ये काम करता त्यांची जपानमधील शाखा किंवा काही रेफरन्सने काही कालावधीसाठी संधी मिळू शकते. यामध्ये टेक्निकल कामाबरोबरच जपानी संस्कृतीची ओळख होते.
जपानमध्ये शिकण्याचे पुढील फायदे होतात
- वैयक्तिक विकास, आंतरराष्ट्रीय नेटवर्किंग, जपानी संस्कृतीचा अभ्यास, जपानी व्यवसायाच्या पद्धतीची माहिती. जपानमधील शिक्षण जगभर उपयोगी पडते त्यामुळे जपानमध्ये शिकून वेगवेगळ्या देशातही नोकरी मिळू शकते.
- Monbukagakusho – यामध्ये खासगी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य मिळते.
- एकूण साधारण ७,४०० शिष्यवृत्ती आहेत. (Total of 12 month and 6 month scholarships)
- पदवी आणि पदविका – ६,८४०
- जपानी भाषा शिकणारे विद्यार्थी – ५६० पुण्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे.
जपानमधील खालील मोठ्या विद्यापीठामध्ये शिष्यवृत्ती मिळते:
१. युनिव्हर्सिटी ऑफ टोकियो
२. ओसाका युनिव्हर्सिटी
३. होक्काइदो युनिव्हर्सिटी
४. नागोया युनिव्हर्सिटी
५. क्यूश्यू युनिव्हर्सिटी
६. केईओ युनिव्हर्सिटी
७. त्सुकुबा युनिव्हर्सिटी
८. अकीता इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी
९. वासेदा युनिव्हर्सिटी
१०. टोकियो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
११. क्योतो युनिव्हर्सिटी
१२. तोहोकू युनिव्हर्सिटी
अजूनही काही विद्यापीठांमध्ये संधी असू शकते.
Credit Link – https://www.esakal.com/education-jobs/article-sujata-kelkar-scholarship-japan-352915
लेखकाचे नाव – सुजाता कोळेकर, सिनिअर डायरेक्टर, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया.