उच्च शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी जर्मनीतील उच्च शिक्षणाच्या संधी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी जर्मनी हा तिसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय देश आहे.येथील बऱ्याचश्या प्रांतामध्ये राहण्याचा खर्च ब्रिटन (Britain)आणि युरोपातील अन्य देशांपेक्षा आहे. कायमस्वरूपी व्हिसा मिळवणे तुलनेने खूप सोपे आहे.
तसेच जर्मनीतील विद्यापीठांमधून मास्टर्स केल्यास जर्मन जॉब मार्केट मध्ये अनेक संधी मिळू शकतात. उद्योग आणि शिक्षण क्षेत्राचे सहकार्य कोर्स केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पटलावर छबी उमटविण्याची संधी मिळते. याच कारणासाठी भारतातील अनेक विद्यार्थी जर्मनीत उच्च शिक्षणासाठी जाण्यास उत्सुक असतात.
जर्मनीत चारशे पेक्षा जास्त विद्यापीठे आहेत. आणि विशेष म्हणजे त्यातील जवळपास ९०% शासकीय आहेत. शासकीय आहेत म्हणून त्यांचा दर्जाही तितकाच चांगला आहे , शिवाय मोफत शिक्षणामुळे तिकडे उच्चशिक्षणाचा ओढा जास्त असतो. तसेच तिथे अनेक खासगी विद्यापीठ आहेत ज्यांची फी वार्षिक साधरण 5 ते 10 लाखा दरम्यान असते. जे भारताच्या किंवा इतर देशांच्या मानाने निम्म्याहून कमी आहे.
टेक्निकल विद्यापीठे?
ही विद्यापीठे शासकीय विद्यापीठांतर्गत येतात.या विद्यापीठांमध्ये तुम्ही तुमचे संशोधन पूर्ण करून पीएचडी मिळवू शकता. तसेच डॉक्टरेट पदवी देखील प्राप्त करू शकता.
युनिव्हर्सिटी ऑफ आप्लाईड सायन्स?
या विद्यापीठांमध्ये व्यावसायभिमुक आणि व्यावहारिक अनुभवावर आधारित अभ्यासक्रमांचा समावेश असतो. शैक्षणिक वर्ष दोन सत्रात असते.हिवाळी सत्र ऑक्टोबर मध्ये तर उन्हाळी सत्र हे एप्रिल महिन्यात सुरू होते .
जर्मनीतील उच्च शिक्षणाच्या संधी
एक वर्ष राहण्यासाठी साधारण दहा हजार युरो किंवा ९ लाख रुपये लागतात. प्रत्यक्ष खर्च त्यापेक्षा कमी होऊ शकतो. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पार्ट टाईम नोकरी आणि internship ची आर्थिक मदत होऊ शकते.या नुसार दोन वर्षांचे पदवी शिक्षण हे साधारण पंधरा ते वीस लाखांपर्यंत आणि तीन वर्षांचे पदवी शिक्षण पंचवीस ते तीस लाख होऊ शकते.
प्रवेश व अर्ज करण्याची पद्धत?
- पदवीसाठी जर्मनीत तेरा वर्षांचे उच्च माध्यमिक शिक्षण आवश्यक आहे. हा निकष पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी भारतातच एक वर्ष पदवी शिक्षण घेऊन अर्ज करू शकता.किंवा जर्मनीमध्ये एक वर्षाचा पदवीपूर्व तयारी अभासक्रम करू शकता.पदवी अभ्यासक्रम हा फक्त तीन वर्षांचा असतो. पूर्व तयारी अभ्यासक्रम आणि पदवीचे शिक्षण जर्मन भाषा शिकून त्यात घेणे जास्त संयुक्तिक ठरते.
- जर्मनीतील विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी साधारण नऊ ते सहा महिने सुरू होते.
- अर्ज करताना आधीच्या गुणपत्रिका इंग्रजी किंवा जर्मन भाषांचे आधिकृत प्रमाणपत्र आणि स्टेटमेंट ऑफ परपज
(SOP) ह्या गोष्टी ऑनलाईन द्याव्या लागतात. - बहुतांश विद्यापीठे हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण गुणवत्तेवर आधारित प्रवेश निश्चित करतात. पूर्व व्यावसायिक अनुभव किंवा internship ला निर्णय प्रक्रियेत वजन असते.
विद्यापीठासाठी GRE प्रमाणपत्राची आवश्यकता असते.व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी GMAT ची परिक्षा
द्यावी लागते .संशोधनासाठी जर्मनीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यात भारताचा क्रमांक दुसरा आहे. अशाप्रकारे तुम्ही जर्मनीत उच्च शिक्षण घेऊन तुमचे भविष्य उज्वल बनवू शकता.
i-Pro Edu:
i-Pro Edu ही उत्साही लोकांची एक टीम आहे, जी लोकांना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मदत करते. ही संस्था इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी, संस्कृत, मराठी आणि हिंदी अशा विविध भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये प्रशिक्षण देते. कॉमर्स अॅकॅडमी अकरावी-बारावी (कॉमर्स), बीबीए, बीबीए-आयबी, बीकॉम, एम.कॉम इत्यादींसह विविध अभ्यासक्रमांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण देते.स्टडी एब्रॉड कन्सल्टन्सी विंग GRE/IELTS परीक्षांच्या तयारीसह परदेशात उच्च शिक्षणासाठी विविध सेवा पुरवते.कॉमर्स आणि मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा प्रशिक्षण आणि परदेशात अभ्यास सल्ला पासून व्यावसायिक कोचिंगपर्यंत अनेक सेवा ऑफर करते.
इथले शिक्षक अनुभवी असून विद्यार्थीप्रिय आहेत. एका कुटुंबाप्रमाणे इथे विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातात आणि त्यांना योग्य सल्ला दिला जातो. आजवर अनेक विद्यार्थी इथून शिक्षण घेऊन आपल्या करीयर मध्ये यशस्वी झाले आहेत. आजच भेट द्या.