जपानचा ॲनिमे उद्योग हा खूप मोठा असून, त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. उदारणार्थ – डिझाईनर्स, प्रोग्रामर्स, ज्यांची चित्रकला चांगली आहे असे विद्यार्थी.
ॲनिमे किंवा JAPANIMATION हा जपानमधील मोठा उद्योग असून, जगभर प्रसिद्ध आहे. आपल्या घरातील मुले डोरोमॉन, शिंच्यान, नोबिता इत्यादी ॲनिमे अगदी रोज पाहत असतात आणि या ॲनिमेशनचे फॅनही असतात. जपानमध्ये ॲनिमेमध्ये करिअर करण्याची उत्तम संधी आहे.
जपानचा ॲनिमे उद्योग हा खूप मोठा असून, त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. उदारणार्थ – डिझाईनर्स, प्रोग्रामर्स, ज्यांची चित्रकला चांगली आहे असे विद्यार्थी.
भारतातील बरीच मुले ॲनिमेच्या आवडीने जपानी भाषा शिकतात आणि पुढे त्यामध्येच करिअरही करतात. जपानचा ॲनिमे उद्योग २.१८१४ ट्रिलियन येन असून त्यातील जवळपास ४६ टक्के महसूल जपान बाहेरून येतो. म्हणजेच ही कार्टून्स जगभर प्रसिद्ध आहेत.
या कार्टून्सबरोबरच जपानमध्ये वेगवेगळ्या टीव्ही मालिकाही कार्टून स्वरूपात प्रदर्शित होतात, त्यामुळे फक्त लहान मुलांप्रमाणे मोठ्या लोकांनाही ॲनिमेची आवड असते. जपानची ॲनिमे कॅरेक्टर्स जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेली आहेत. ॲनिमे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या नोकऱ्यांची संधी असते. क्रिएटिव्ह काम करणारे टीम मेंबर्स, तसेच ही वेगवेगळी कॅरेक्टर डिझाईन करणारे टीम मेंबर्सही लागतात. जपानमध्ये या कंपन्यांमध्ये काम करायचे असेल, तर जपानी भाषेबरोबरच जपानची संकृती माहिती असणे या क्षेत्रासाठी अत्यावश्यक आहे. कारण सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला जातो.
मी २००३मध्ये चेन्नईत एका ९ वर्षाच्या मुलाला भेटले होते, तेव्हा त्याच्याकडे जपानी कॅरॅक्टर असणारे एक ॲनिमेचे पुस्तक होते. त्याला त्या पुस्तकांची खूप आवड होती. तेव्हा त्याने मला विचारले होते की, जपानी भाषा शिकून मला अशी ॲनिमे बनवता येतील का? त्यावर मला त्याच्या ॲनिमेच्या आवडीचे कुतूहल वाटले आणि मी त्याला सांगितले की, तू जपानी भाषा नक्की शिक. त्यानंतर एक आठवड्यानेच त्याने मला मी जपानी भाषा शिकायला सुरुवात केली आहे, असे सांगितले. (जपानी वर्गामध्ये तो सगळ्यात लहान मुलगा होता आणि भाषा शिकण्यासाठी तो १२ किलोमीटर जात होता.) मी २०१४मध्ये जपानला गेले होते, तेव्हा तो मला एका मंदिराच्या बाहेर मंदिराचे चित्र काढताना भेटला. अर्थात त्यानेच मला ओळखले, वाकून नमस्कार पण केला, क्षणभर मला काहीच कळले नाही. मग त्याने मला चेन्नईच्या त्या प्रसंगाची आठवण करून दिली आणि सांगितले, ‘मी एका ॲनिमेशन कंपनीत क्रिएटिव्ह डिझाइनर आहे.’ आमच्या धावत्या भेटीत त्याने त्याचे खूप मजेशीर अनुभव सांगितले. मुळातच स्वतःच्या आवडीचे काम करायला मिळावे आणि त्याचे पैसेही मिळावे याच्यासारखा सुवर्णयोग नाही. आठवड्यातून कमीत कमी एक दिवस हा मुलगा डिझनी वर्ल्डमध्ये कामासाठी जातो. माझ्यासाठी तो एक सुखद अनुभव होता.
अगदी ज्युनिअर मुलांपासून खूप अनुभव असणाऱ्या उमेदवारांसाठी खूप संधी असणारा असा हा व्यवसाय आहे. फक्त नोकरीसाठीच नाही, तर जपानमधल्या कॉलेजेसमध्येही या व्यवसायाबद्दल शिकण्यासाठी जाता येऊ शकते.
Credit Link – https://www.esakal.com/education-jobs/japan-and-opportunity-japanese-animation-business-324787
लेखकाचे नाव – सुजाता कोळेकर, सिनिअर डायरेक्टर, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया.