तुम्ही जपानच्या कुठल्याही मॉलमध्ये किंवा प्रसिद्ध ठिकाणी गेल्यास मसाज पार्लर आढळतीलच. या मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मसाज केला जातो आणि त्यात भारतीय आयुर्वेदिक पद्धतीच्या अभ्यंगचा समावेश आहे.
जपानमधील ५० वर्षाच्या स्त्रिया पाहिल्या, तर त्या अगदी तिशीतल्या असल्यासारख्या दिसतात. त्यात त्यांच्या खाण्याच्या सवयीचा आणि नियमित व्यायामाचा वाटा आहेच, परंतु त्यामध्ये जपानमधील सौंदर्य प्रसाधनांच्या कंपन्यांचाही तेवढाच वाटा आहे. आज आपण या कंपन्यांमधल्या वेगवेगळ्या नोकरी आणि व्यवसायांविषयीची माहिती पाहूया.
जपानची कॉस्मॅटिक इंडस्ट्री खूप मोठी असून, २०१८मध्ये या इंडस्ट्रीचा महसूल २.७ ट्रिलियन जपानी येन इतका होता. जपानमधील सौंदर्य प्रसाधन उत्पादन करणाऱ्या अग्रगण्य कंपन्या जगभर प्रसिद्ध आहेत. त्यात ‘शिसेइडो’, ‘कोसे’, ‘पोला ऑर्बिस’ या कंपन्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतात. प्रामुख्याने देशांतर्गत बाजारावर लक्ष केंद्रित करणारे ब्रँड जपानी सौंदर्यप्रसाधनांच्या उद्योगाच्या यशस्वीरीत्या योगदान देतात.
जपानी सौंदर्यातील ट्रेंड:
जपानी ग्राहक सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना उच्चप्रतीची उत्पादने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यासाठी मूल्य मोजतात. म्हणूनच, त्वचारोग, सौंदर्यप्रसाधने या क्षेत्रातील डॉक्टर संशोधनात अग्रेसर आणि विकसित उत्पादनांचा समावेश असलेल्या ब्रँडची शिफारस रुग्णांना करतात. त्यामुळे अशाच उत्पादनांची विक्री जपानमध्ये मोठ्या प्रमाणात वाढते. ग्राहकांच्या आरोग्यास टिकवून ठेवण्यासाठी जागरूकता जपानमधील नैसर्गिक आणि सेंद्रीय सौंदर्य उत्पादनांच्या वाढीस अधिक कारणीभूत आहे.
मेकअपसाठी लागणारे साहित्य:
जपानमध्ये २०१९ या वर्षी मेकअपसाठी लागणारे ५३.३ लाख किलो साहित्य विकले गेले. या साहित्याची किंमत तब्बल ३७२.९८ अब्ज जपानी येन होती.
अत्तर-
जपानमध्ये २०१९मध्या ४.९५ अब्ज जपानी येनचे अत्तर विकले गेले.
वरील आकडे पाहून तुम्हाला ही बाजारपेठ किती मोठे आहे याचा अंदाज आला असेलच.
सौंदर्य इंडस्ट्री आणि नोकऱ्या
मेकअप आर्टिस्ट –
प्रत्येक पार्लरमध्ये तसेच सगळ्या मोठ्या मॉल्समध्ये मेकअप कॉर्नरमध्ये काम करण्यासाठी मेकअप आर्टिस्ट लागतात. मेकअपच्या कलेबरोबरच त्यांना वेगवेगळ्या व्यक्तीच्या त्वचेची माहिती असावी लागते. याचे ट्रेनिंग कंपनी देते. ब्टुटिशिअन्सना या नोकऱ्या मिळू शकतात.
टॅटू आर्टिस्ट –
याची जगभरात खूप मागणी आहे. जपानच्या तरुण वर्गात टॅटू खूप प्रसिद्ध असल्यामुळे या कलाकारांनाही चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात.
ब्युटी थेरपिस्ट –
तुम्ही जपानच्या कुठल्याही मॉलमध्ये किंवा प्रसिद्ध ठिकाणी गेल्यास मसाज पार्लर आढळतीलच. या मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मसाज केला जातो आणि त्यात भारतीय आयुर्वेदिक पद्धतीच्या अभ्यंगचा समावेश आहे. त्यामुळे हे काम करणाऱ्या लोकांना तिथे खूप मागणी आहे.
ब्युटी एडिटर्स –
हे लोक सध्याचे ट्रेंड्स काय आहेत, नवीन ट्रेंड्स कोणते येणार आहेत अशा पद्धतीचा अभ्यास करतात. त्यासाठी ते वेगवेगळे इव्हेंट्स करतात. या नोकऱ्यांमध्ये पगार जास्त मिळतो.
पब्लिक रेलशनशिप आणि मार्केटिंग –
यामध्ये फक्त ब्युटी प्रॉडक्ट्सचे मार्केटिंग करावे लागते.
या क्षेत्रामध्ये खालील विविध प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध होतात, मात्र या सर्व नोकऱ्यांसाठी जपानी भाषा चांगली येणे आवश्यक आहे.
Credit Link – https://www.esakal.com/education-jobs/sujata-kolekar-write-article-beauty-industry-and-jobs-japan-383223
लेखकाचे नाव – सुजाता कोळेकर, सिनिअर डायरेक्टर, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया.